Monday, June 18, 2012

वाघ्र संवर्धन - वस्तुस्तिथी व गरज

          आज असाच अल्बम चाळत बसलो होतो आणि जुना फोटो पाह्यला...महाबळेश्वर ला का कुठेतरी खोट्या वाघाबरोबर काढलेला ग्रुप फोटो होता....दोन divasanpurvi  IBN वर ऐकलेली बातमी आठवली -जानेवारीपासून भारतात अंदाजे ५० वाघ मृत .म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.बरे हे आकडे निर्लाज्ज्यापणे दर महिन्याला सांगितले जातायत पण काही फरक नाही. माणसं मरत नाहीयेत ना तर मग झालं असाच काहीसा समाज झाला असावा काहींचा !!!!!!!


                   असं काही वाचलं कि खूप वाईट वाट्ते .वाघ म्हटला कि डोळ्यासमोर येतं ते पिवळा जर्द देखण जनावर अंगावर पट्ट्यांची देखणी करामत ....चाल असावी तर ह्याच्यासारखी.....रुबाब असावा तर ह्याच्यासारखा ...जनावर असावा तर वाघारासारख .....गोनीदांच्या भाषेत उमदं...बघूनच डोळ्याचे पारणे फिटावे .निसर्गाने भारतावर भरभरून कृपा केलेली .१९व्या शतकात ह्यांची एकूण संख्या लाखभर होती व भारतात तर ४०एक हज्जार ...आज जी केवळ १ दीड हजाराच्या घरात आहे .हौशी शिकारयांची ,जुन्या महाराजांची स्वार्थी ,तस्करांची , गोऱ्या साहेबाची कृपा बाकी काय?? रिटायर्ड व्हायच्या आधी नावावर एकतरी वाघ लागला पाहिजे म्हणजे तो मोठेपणा होई ...काही शिकारी व गोरे साहेब स्वताचा पराक्रम अमुक वाघ मारले असं सांगत .त्या पैकी काहीनि तर शेकडो वाघ मारले ,केवळ मजेकरिता,हौस म्हणून !!! त्यामुळे एकेकाळी समृद्ध वाघ्रभूमी असलेला भारत त्याबाबतीत भिकारी झाला.इतर अनेक कारणा आहेत त्याला पण शिकार हे प्रमुख कारण जे आजतागायत थांबलेला नाही किंबहुना आपण थांबवू शकलेलो नाही

                      लोकसंख्या वाढ, शहरीकरण ,व्यावसायिकी करण ह्या कारणांमुळे जंगलांचा र्हास होत गेला आणि पर्यायाने इतर प्राण्यांचा देखील .... eco system कोलमडूनच गेली अगदी.वाघांच्या अवयवांना जागतिक बाजारात असलेली सोन्याची किंमत (हाडे -६००० डॉलर्स / किलो ,कातडी,मांस इ ) हि देखील त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील शिकारीला कारणीभूत ठरली / ठरतायत ह्या सगळ्या कारणांमुळे वाघांची संख्या दीड हजारापर्यंत आलीये .

             १९७२ साली जेव्हा हि गोष्ट सरकारच्या लक्षात आली तेवा कुठे ह्यासाठी कायदा करण्यात आला (wild life protection act १९७२) व त्याच्या पुढील वर्षात project tiger आणण्यात आला.कित्येक चांगले मुद्दे ,चांगला act असूनदेखील ४० एक वर्षांनी देखील वाघांची संख्या तेवढीच दिसतेय .कारणा शोधायची झाली तर कित्येक आहेत. सरकारची उदासीनता , कुशल कामगारांचा अभाव ,पैशाची कमतरता हि अनेक कारण आहेत.कित्येक वाघ्र प्रकल्पात १८ २० वर्ष नवीन भरतीच झालेली नाही.सरकारकडून मिळणारे अनुदान वर्ष वर्ष उशिरा मिळते .शिकार्याविरूढ ठोस उपाय योजना नाहीत.आज देशात १७ राज्यात एकूण ३९ tiger reserves आहेत पण संवर्धन काही झालेले दिसत नाही.

                 माझ्या वाचनात चीन मधील tiger reserve बद्दल आले.तेथील औषधांमध्ये वाघाची हाडे वापरण्यात येतात त्यामुळे बेसुमार पणे कत्तल होऊन तिथे हि हीच परिस्तिथी होती.मग सरकारने ह्यावर निर्बंध आणले .मोठ्या प्रमाणात तेथे वाघांची पैदास चालू केली..म्हणजे पिंजर्यात किवा म्हणू कि संरक्षित वातावरणात .परिणामी वाघांची संख्या १००० च्या घरात गेली पण हे वाघ जंगलात खरया वाघान्सारखे नाही वागू शकले त्यांना शिकार करता येईना मग त्यासाठी वेगळा कार्यक्रम राबवला गेला.अजूनही तिथे ते निर्बंध उठवण्यासाठी सरकारवर जोरदार दडपण येत असते.पण एक वेगळा जाणीवपूर्वक प्रयत्न करून त्यांनी त्या वागांचे जंगलात पुनर्वसन चालू केले .हे सगळे वाचला सोपे वाटले तरी खरी मेख वेगळीच आहे. अमुक इतक्या क्षेत्रफळाच्या जागेत अमुक इतकेच वाघ राहू शकतात .त्यांना उपजीविकेसाठी लागणारे प्राणी त्या प्रमाणातच त्या जंगलात असतात त्यामुळे अशा प्रकारे अचानक बरेच वाघ कमी जागेत नाही सोडता येऊ शकत.पण त्यांच्याकडून ह्या बाबतीत आपण काही मदत किवा धडा आपण नक्कीच घेऊ शकतो व आपल्याकडे हि असं उपक्रम राबवू शकतो.

                       वाघांच breeding फार लवकर लवकर होऊ शकत हे फार कमी जणांना माहित असेल.३ १/२ वर्षांची मादी पिलांना जन्म देऊ शकते व नंतरच्या breeding साठी देखील २० महिने एवढा कमी वेळ ती घेते .म्हणजे प्रयत्न केल्यास वाघांची संख्या भरपूर वाढू शकते.चांगल्या वातावणात पिल्ले देखील जगू शकतात .एका मोठ्या वाघाला वर्षाला हरणांच्या आकाराचे ४५-५० प्राणी लागतात तेच प्रमाण २-३ पिल्ला असलेल्या मादीला ७० पर्यंत असते.म्हणजेच वाघ वाचवायचे असल्यास हि इतर जनावर देखील त्या प्रमाणात उपलब्ध हवीत.ह्यासाठी एकंदरीत वाघ बचाव मोहीम म्हणजे जंगल बचाव मोहीमच असते. असं सगळं असल तरच जंगलाचा समतोल राखला जातो.

              वाल्मिक थापर ह्या लेखकाने ह्यावर अत्यंत जळजळीत पुस्तकं लिहीलीयत व सद्य स्तिथी बद्दल बरच चांगलं लिहिलंय. पण तुमच्या आमच्यासारखी माणस हजार वेळा ओरडली कि वाघ वाचवा म्हणून वाघ वाचणार नाह्येत त्यासाठी सरकारनेच कडक पावलं उचलायला हवीयेत.पुरेसा निधी वेळेवर उपलब्द करून देणं,tiger reserves ना कचेरीच्या वेळखाऊ प्रक्रियेतून मुक्त करण ,पुरेसा आत्मीयता व शिषण असणारा staff त्यांना मिळेल ह्याची काळजी घेणे ,शिकार्याचा बंदोबस्त करणे ,आदिवासीचे पुनर्वसन करणे जेणेकरून ते शिकार करणार नाहीत ,नजीकच्या गावातील लोकाच्या गरजा भागवणे कि ज्यामुळे त्यांची जंगलावरील अवलाम्बितता कमी होईल ,लोक जागरण करणे ह्या सगळ्या घासून गुळगुळीत झालेल्या मुद्द्यांचा निकाल लावणे फार म्हणजे फार गरजेचे आहे .

                 मी प्रोजेक्ट टायगर ची site पाहिली. माहिती आहे त्यात, पण ती २००५-६ नंतर update केलेली नाही ह्यावरून काय ते समजा.मागे मागे पर्यंत रनत्म्बोर सारख्या ठिकाणी पर्यटकांच्या दिवसाला १५०० गाड्यांची नोंद झालेली आहे.हे कुठेतरी थांबवले पाहिजे.अरे त्या जनावरांना पण घेऊ द्या कि मोकळा श्वास .त्यांनी कुठे जायचं.माणसांनी टाकलेल्या जमिनीच्या तुकड्यावर राहायचं ..अरे हे सगळं त्यांचच होतं कि ....आपण ते बळकावून घेतल आणि आता ओरडतोय कि आपण त्याचं पुनर्वसन करतोय म्हणून.......१७०६ ....!!!!!!......आणि आपण खुश ....जयराम रमेश(गेल्या वर्षापर्यंत कार्यभार सांभाळला) काय किवा महाराष्ट्राचे वनमंत्री काय ...ह्यांना किती जिव्हाळा असेल जंगला बद्दल .....काय म्हणून ह्याच्या हातात सर्व अधिकार ????कुणी पक्षीतज्ञ ,प्रानीतज्ञ का नाही हि सर्व जबाबदारी सांभाळू शकत??? कशाला हव राजकारण मध्ये ???

 लिहिण्यासारखं खूप आहे पण हे जे लिहिले ते राहवलं नाही म्हणून!!!! प्रोजेक्ट टायगर यशस्वी होईल ,आपली जंगल परत समृद्ध होतील,नामशेष झालेली किवा मार्गावर असलेले पशु पक्षी पुन्हा खेळू बागडू लागतील तो दिवस सोन्याचा असेल .....बुद्धी आणि ताकतीच्या जोरावर उन्मत्त झालेल्या मानवाला निसर्ग शड्डू ठोकून जरूर प्रतुत्तर देईल .......कि केविलवाणे बघत स्वताचा र्हास करून घेत राहील ???

-----------------------------------------------------------------------

ref from net / books / newspaper
-----------------------------
exuse for typing mistakes as typing marathi is nighmare here

4 comments:

Sachin Jadhav said...

Prashant,
U r a veery good writer. Some words are really polished & bright!

Kindly note, "जयराम नरेश is not Environment min, currently last year he shifted to Rural development ministry."

In this article your main focus is to blame Govt.urbanisation but their are many more reason by which tiger's get killed. Need to emphasis on it.

prashant p mayekar said...

FYI======Although tigers can mate at any time, breeding is more frequent from November to April. On average, tigers give birth to 2-3 cubs every 2-2.5 years, and sometimes every 3-4 years. If all the cubs die, a second litter may be produced within 5 months. Gestation is usually 104-106 days and births occur in a cave, a rocky crevice, or in dense vegetation.

prashant p mayekar said...

dear sachin
thnks for pointing tht mistake....i dont think that i had kept focous to blame govt ...but situation is like that at present govt is only body which can intervene the situation nd really can improve it...who else can take charge nd make changes happen???NGO's had their limitation...lot of written nd verbal jargon involved but actual result is disappointing....still u belibe m blaming govt thn pl suggest wht can be done ??

Anonymous said...

जयराम नरेश navachi vyakti bharatachya rajkarnat nahi...
Pan.... Jayram Ramesh was there