Monday, October 12, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

"शेतकरयाची गळफास लावून आत्महत्या " ही बातमी किती वेळा तुम्ही आम्ही वाचली असेल,कधी जाणवला तिचा खरा अर्थ ......ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडत नाहीत ना मग झाला!!! असा दृष्टिकोण ठेवुन बरेच जन वागत असतो पण त्याची तीव्रता जाणवली ती काल .....अचानक एक मराठी चित्रपट पहिला अणि सत्याची भीषणता पाहून जिवाची घालमेल जाली ।
" गोष्ट छोटी डोंगरा एवढी"......महाराष्ट्रात चाललेल्या शेतकर्यांच्या अत्महत्यांवर आधारित असलेला हा चित्रपट...चित्रपट कसला सत्य परिश्तितिचे दर्शनच ते ....आज आपण किती जण विचार करतो की एक शेतकरी मेला तर त्याच्या कुटुम्बाचे काय होत असेल...अस काय घडत असेल की गेल्या कही वर्षात २८००० शेतकर्र्यांनी आत्महत्या कराव्यात .......शेती म्हणजे जुगारच ...कीमान आपल्या देशात तरी....वीज नही...पानी नही....कधी पाउस जास्त तर कधी सुका दुष्काळ .....शेतमालाला पुरेसा भावः नही....
काही प्रश्न तर आपल्याला अनुत्तरित करतात ....चित्रपटा मध्ये वास्तव प्रसंग कित्येठिकाणी दिसतात जसे की शेतकरी कर्ज घेतो पण फेडू शकत नही कारण पाउस पाण्याची काही शाश्वती नसते ....न सरकार कडून चांगल्या प्रतीचे बी बियाने व ख़त मिळत...त्यात बैल विकायची पाळी येऊन हाताने जोत धरनारे कितीतरी शेतकरी आहेत ??....प्रत्येक ठिकाणी व्यवस्था लाच ,फसवेगिरिने पोखरलेली आहे... साधे कर्ज पास करूँ घ्यायचे म्हंटले तरी लाच द्यावी लागते अणि बियाने ख़त घयाचे ठरवले तरी देखिल ... मग सावकार ह्या गरिबाना देशोधडीला लावतात ...त्याच्या गरजेची कीमत करून ....चित्रपटात एक प्रसंग आहे की शेतकरी त्याचा बैल विकतो तोही केवल ५०० रुपयाना ...अणि पैसे घेऊन निघताना त्याला म्हणतो माफ़ कर रे बाबा....काय अशी परिश्तिती कुणावर ओढवली नसेल ??? शेती कही जुगारापेशा कमी नाहि हे नायक जेवा सांगतो तेवा ते तंतोतंत पटते ......पाण्याचा भरवासा नही...वीज दिवसातले २२ तस गायब .....बियाने ,खतासाठी सरकारकडे भिक मागुन ते चांगल्या प्रतीचे मिळेल की नाही खात्री नही ....नविन उपकरणे नाहीत ...ठोस उपाययोजना नाहीत ....परत पिक येइल की नाही त्याची काही खात्री नही...जुगार नाही तर काय आहे हे .....
"एक किलो गव्हासाठी जेवा देश गहाण ठेवावा लागेल ना तेवा मेलेल्या शेत्कर्याच्या आत्म्याला शान्ति मिळेल "हे वाक्य तर ह्या घटनांची दारुण भीषणता व सरकारचा अव्यवहारिक दृष्टिकोण दाखवत .सरकारचा दृष्टिकोण म्हणजे बाजारभाव मिळत नही,मालाची प्रत तपासली जाती,कर्जा वेळेवर मिळत नाही,मिळाले तरी लाच घेतली जाते,कर्जा वसुलीच्या नावाखाली बिचारया शेतकरयाच्या घरातली शेळ्या मेंडयांपासून ते भांड्या कुन्ड्यापर्यंत वस्तु नेल्या जातात ..इतकच काय तर मेलेल्या शेतकरयाच्या अन्तिम कार्यासाठी देखिल पैसे नसताना त्या कुटुम्बाची कुत्तर ओढ़ केलि जाते...का...२१ व्या शतकात महाशक्ति होण्याचा विचार करणार्या भारतामधिल हे दृश्य का पलटू नए...का ते सर्वांगी अशक्य हे????
ज्याला दोन वेळाचे अन्न खायला पैसा नही त्याची मुल काय म्हणून शेतीकाडे वळतील ....कसे शिक्षण घेतील....दळ्न वळणाच्या सुविधा देखिल बेताच्याच ..मुलीची लग्न कर्जा काढुनच करायची????
नीलू फुले एक प्रसंगात म्हणतात शेत्कार्याना मेल्यावर लाख लाख रुपये जाहिर करता त्यापेक्शा त्याना जगण्यासाठी का नाही १०- १५ हजार देत ???किता साधा सोपा प्रश्न किती साद्या सोप्या अपेशा पण त्याही हा देश नही पूर्ण करू शकत???
शेत्कार्याना मालाचे पैसे मिळतात पण तेहि उशिरा मग बैंक लेट फी कापून हातात उरतात त्या चिन्चुकाच ....चेक वटन्यासाठी त्याना बैंक अकाउंट उघडावे लागते ते वेग़ळे..त्या बँकेत जाण्यासाठी खर्चा करावा लागतो तो वेगळा...कधी तरी कोणी तरी हे प्रश्न विचारत घेतले आहेत काय???चित्रपटामधुन माडल्यामुळे आज ह्या प्रश्नाशी प्रत्येक जन परिचित ज़ाला आहे .....
ह्या ब्लोगमधे लिहिलेला प्रत्येक शब्द हा त्या चित्रपटात मांडलेला आहे पण लिहिण्याचा उपद्व्याप ह्याचसाठी की काही लोकासमोर ज्यानी तो चित्रपट पाहिला नाही त्याच्या समोर आपल्या शेतकरी बंधवांची खरी परिस्थिति यावी ....आज मौल मधे जाऊंन १००० एक रुपडे खर्चा करताना आपण हात आवरत नाही की मुल्टिप्लेक्स मधे पिक्चर बघताना शे पाचशे कड़े बघत नाही ....पण ह्या गरिबंकडे चैनिसाठी काय तर बेसिक गरजासाठी देखिल पैसा नसतो....
ह्या देशाची राजकारणी प्रेताच्या टाळूवरचे लोनी खानारयाची जमात आहे तरीदेखिल येनारया काळा मधे ही परिस्तिथि सुध्रेल हीच माफक अपेक्षा ...एकीकडे ५० लाखाचा हार दररोज गळ्यात घालणारी व करोडो रुपयाची माया जमावानारी श्रीमंत व दुसरीकडे आपला गरीब शेतकरी हा विरोधाभास कमी व्हावा व भारतातील प्रत्येक जन सुखात नान्दावा हीच देवाजवळ प्रार्थना !!!!!!