आपण कुणी सिद्धहस्त लेखक नाही अन एवढ सगळ लेखन वाचून झाल्यावर मात्र न्युनगंड येतो की एवढ्या सगळ्या दर्जेदार लेखनानंतर आपला लिहिण्याचा अट्टहास का? मी लिहू शकतो...ते वाचनीय असुही शकेल...किंवा जवळच्या मित्राना ते वाचनीय वाटत ही असेल पण ह्याचा अर्थ असा नव्हे की मी काहीही लिहत सुटाव ....चांगल वाचन उदा व पु ,खांडेकर,गो नि दा ,पु ल इत्यांदिंचे वाचल्यावर तर मग असला नसला हुरूप पण निघून जातो ,वाटत काय चाललय हे..का माझा हा अट्टाहास ...दिसत असुनही संजय असल्याचा आव आणण्याचा.....जर मी मनासारखे लेखन करू शकलो तर कुछ बात है नाहीतर मग महीनों महीने काहीतरी आठवत बसावे आठवले तरी कंटाळा करून लिहू नये असे चालणे ह्यास अर्थ नाही ...लेखनी हातात घेतल्यावर शब्द गुलाम होतात तो लेखक व कल्पना ज्याच्या गुलाम होतात तो कवी .....असो अरे पण असही म्हणतात की सर्वोच्च ग्रंथ म्हणजे द्यानेश्वरी त्यानंतर कुणी काही लिहिल नसत तरी चालल असता तरी पण मराठी वाड्मय ओसंडून वाहतेय की ....मग आपण पण लिहिले चार शब्द तर काय बिघडल .....हा पण ते लिहिणे प्रसिद्धिसाठी नसावे आत्मसंतुष्टि साठी असावे असा माझ प्रान्जळ मत आहे ...कुणालाही
आवडायच्या आधी तुमचे लिखाण तुम्हाला स्वताला भावले पाहिजे ह्या वपु च्या वाक्याला सलाम .... कुणाला हे सगळा नाचता येईना आंगन वाकडे वाटेल पण तसे न म्हणता मी हे म्हणेन की प्रत्येकाचा स्वताचा आपला प्रान्त असतो पण तो सोडून त्याने कही प्रयत्न करू नये असे नव्हे ...मी देखिल प्रयत्न करतोय तो देखिल आनंदासाठी ....तर काय बिघडल ....वरील कुणाला हा बरयाचवेळी मी स्वत असतो ..अणि मग स्वताची अशीच समजुत पण काढतो...बघू कसा काय जमते ते लिखाण येनारया काळात....